उर्फी जावेदला दुबईतील पोलिसांनी घेतले ताब्यात? कसून चौकशीही सुरू, जाणून घ्या प्रकरण

दुबई: टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) हिच्याशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद हिला दुबईत अतरंगी कपडे घालणे महागात पडले आहे. रिवीलिंग ड्रेस घातल्याने उर्फीला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून सध्या तिची कसून चौकशी सुरू असून तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद दुबईत आहे. तिथे ती तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी गेली आहे. परंतु भारताप्रमाणे दुबईतही उर्फीने अतरंगी कपडे घालणे सोडले नाही. दुबईत रिवीलिंग ड्रेस घातल्याने ती दुबई सरकारच्या निशाण्यावर आली आहे.

ईटाइम्सच्या वृत्तानुसार, उर्फी दुबईच्या रस्त्यांवर अर्थातच पब्लिक प्लेसमध्ये इंस्टाग्राम व्हिडिओसाठी शूट करत होती. यावेळी तिने स्वत: डिझाईन केलेला ड्रेस घातला होता, जो दुबईतील लोकांना खूप रिवीलिंग वाटला. दुबईत खुल्या भागात असे कपडे घालण्याची परवानगी नाही. तरीही उर्फीने ही चूक केल्याने तिच्याविरोधात दुबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. ज्यानंतर दुबई पोलिसांनी शूटिंगच्या ठिकाणी जात उर्फीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस तिची चौकशी करत आहेत. यामुळे दुबई पोलीस उर्फीचे भारतात परत येण्याचे तिकीटही पुढे ढकलू शकतात, असेही बोलले जात आहे. असे असले तरीही, अद्याप या वृत्ताची अधिकृत पुष्टी झालेली नाही.