कितीही लपवलं तरी जगासमोर आलंच… अभिनेत्री तमन्ना भाटियाचा बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडिओ व्हायरल!

मुंबई- सिनेविश्वात एक ना एक लिंक-अपच्या बातम्या समोर येत राहतात. या जोडप्यांमध्ये साऊथ इंडस्ट्रीतील दोन कलाकारांच्या नावाचाही समावेश झाला आहे. ते दुसरे कोणी नसून विजय वर्मा (Vijay Varma) आणि तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) आहेत. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांचा न्यू इयर पार्टीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या. तेव्हापासून दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. अशातच आता काल रात्री विजय आणि तमन्ना एकत्र डिनर डेट (Tamanna-Vijay Dinner Date) एन्जॉय करताना दिसले आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये विजय वर्मा आणि तमन्ना डिनर डेटचा आनंद घेतल्यानंतर रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर दोघेही सोबत कारमध्ये बसले. व्हिडिओमध्ये, तमन्ना पांढर्‍या क्रॉप टॉपसह राखाडी रंगाची पँट परिधान केलेली दिसत आहे, तर विजयने चेक शर्ट आणि हलक्या रंगाची पँट घातली आहे. हा व्हिडिओ समोर येताच चाहते त्यावर सातत्याने कमेंट करत आहेत आणि आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून चाहते त्यावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, ‘दोघेही खूप प्रेमात दिसत आहेत.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘ते खरोखरच जोडप्यासारखे दिसतात.’