गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत रोमँटिक झाला अहान शेट्टी, अभिनेत्याचे किस करतानाचे फोटो व्हायरल

Ahan Shetty-Tania Shroff Romantic Photo: बॉलीवूडचे अण्णा सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांचा मुलगा व अथिया शेट्टीचा (Athiya Shetty) भाऊ अहान शेट्टी (Ahan Shetty) क्वचितच लाइम लाइटमध्ये राहतो. पण, आता त्याचे ताजे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अहान त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत (Rania Shroff) स्पॉट झाला आहे. दोघे नुकतेच मॉडेल सोफिया रिची आणि इलियट ग्रेंज यांच्या लग्नाच्या पार्टीत सहभागी झाले आहेत.

तानिया श्रॉफने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर लग्नाच्या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये वधू-वरांसोबत ती अहानसोबत पोज देताना दिसत आहे. दोघांची जोडी खूप पसंत केली जात आहे. अहानची बहीण आणि सुनील शेट्टींची मुलगी अथिया शेट्टीनेही या फोटोंवर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाचा वर्षाव केला आहे.

अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफचे व्हायरल झालेले फोटो तुम्ही पाहू शकता. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत खूप रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. एका फोटोमध्ये अहानने त्याच्या लेडी लव्हला तिच्या गालावर किस केलेले दिसत आहे. या लव्ह बर्ड्सच्या रिलेशनवर अथिया व्यतिरिक्त सर्व स्टार्सनी आपल्या प्रेमाचा वर्षाव केला आहे.