औरंगाबादचा पाणी प्रश्न भाजप मुळेच रखडला; चंद्रकांत खैरेंचा अजब दावा

औरंगाबाद – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत पुन्हा एकदा पाणी प्रश्न (Water Crisis) पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादेत ‘जल आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. औरंगाबादमधील सामान्य नागरिक देखील या मोर्चात सहभागी झाले असून महिलांचा सहभाग देखील लक्षणीय आहे.

भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाले होते. हंडा हातात घेऊन महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), डॉ. भागवत कराड यांच्यासह भाजपचे अन्य नेतेही उपस्थित होते . यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. इतकी वर्षे सातत्याने महापालिकेत सत्ता असूनही संभाजीनगरमध्ये पाण्याचा जो सत्यानाश शिवसेनेच्या काळात झाला, त्याची फळं औरंगाबादकर भोगत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नव्हे तर केवळ राजकारण (Politics) करण्यासाठी भाजपचे हे आंदोलन करण्यात येत असल्याची टीका चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)यांनी केली आहे. औरंगाबादचा पाणी प्रश्न भाजप मुळेच राखडल्याचेही त्यांनी म्हटले आहे.