नमस्ते सदा वत्सले मातृभूमे … : पुण्यात शेकडो स्वयंसेवकांच्या उपस्थितीत विजयादशमी उत्सव साजरा

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी दरसा म्हणजेच विजयादशमी हा महत्वाचा दिवस असतो. या सणाच्या निमित्ताने तसेच स्थापना दिवसाच्या निमित्ताने पुण्यात संघातर्फे अनेक परिसरात पथसंचलन करण्यात आलं. कर्वेनगर आणि कोथरूड परिसरात देखील ध्वजदंड आणि घोष पथकासोबत हे संचलन करण्यात आलं होतं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांचे विजया दशमीचे संचलन यांचे नाते खूप अतूट आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या संचलनात भाजप नेते गिरीश खत्री यांनीही भाग घेतला तसेच शहरातील अनेक नेत्यांनी तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक संघ स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला. यावेळी संचलनात संघाचे प्रमुख पदाधिकारी व स्वयंसेवक देखील खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील विविध भागात संघ स्वयंसेवकांनी अतिशय शिस्तबद्ध असे संचलन केले.यावेळी नागरिकांनी फुलांची उधळण करत या संचलनाचे स्वागत केले.