नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये बॉबी देओल कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार? जाणून घ्या सत्य

Bobby Deol As Kumbhakarna:- संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ला चांगले यश मिळाले आहे. हा चित्रपट 2023 मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या शानदार यशानंतर रणबीर कपूर आता सई पल्लवी आणि यशसोबत ‘रामायण’च्या (Ramayan) शूटिंगला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सगळ्या दरम्यान, असाही अंदाज लावला जात होता की, निर्माते अॅनिमलच्या अबरार हकला म्हणजेच बॉबी देओलला कुंभकर्णाच्या भूमिकेसाठी आणण्याच्या विचारात आहेत. नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये बॉबी कुंभकर्णाची भूमिका साकारणार आहे की नाही हे जाणून घेऊया?

बॉबी देओल ‘रामायण’मध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणार?
ETimes च्या वृत्तानुसार, बॉबी देओलच्या टीमने रामायणमध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दलच्या सर्व अटकळांना पूर्णपणे नकार दिला आहे आणि या सर्व अफवा चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. यासोबतच नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये बॉबी देओलचा समावेश नसल्याचेही टीमने स्पष्ट केले आहे. म्हणजेच बॉबी देओल चित्रपटात कुंभकर्णाची भूमिका साकारत नाहीये.

लारा दत्ता ‘रामायण’मध्ये कैकेयीची भूमिका साकारणार?
अशी देखील अफवा पसरत आहेत की निर्माते कैकेयी म्हणजेच राजा दशरथची तिसरी पत्नी आणि राजा भरतची आई या भूमिकेसाठी लारा दत्ताला चित्रपटात कास्ट करण्यास उत्सुक आहेत. पिंकविलाच्या वृत्तानुसार, लारा या प्रकल्पासाठी खूप उत्सुक आहे, तर बॉबी ‘अॅनिमल’च्या यशानंतर अनेक प्रस्तावांपैकी त्याच्या पर्यायांचा विचार करत आहे. या चित्रपटात भगवान हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलला कास्ट करण्यात आल्याचंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मात्र, अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही.

‘रामायण’ची स्टार कास्ट अद्याप निश्चित झालेली नाही
नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर रामची भूमिका साकारत असल्याच्या अफवा आहेत. साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. तथापि, या सर्व अफवांमध्ये, सत्य हे आहे की चित्रपटासाठी कास्टिंग अद्याप निश्चित झालेले नाही. आता नितेश तिवारीच्या रामनायामध्ये कोणते स्टार्स दिसणार हे पाहणे बाकी आहे. सध्या चाहत्यांना या प्रोजेक्टबद्दल खूप उत्सुकता आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या-

New EV Policy: आता होणार खरा धमाका; भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा मेगा प्लान

‘मी मृतदेह पिशवीत नेला, पण मी मुलाची हत्या केली नाही’, सूचना सेठचा दावा

संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाले आहेत; अमोल मिटकरी यांची खोचक टीका