Virat Kohli Century: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात कोलकाता येथे वनडे विश्वचषक २०२३ चा (ODI World Cup 2023) साखळी फेरी सामना झाला. हा सामना भारतीय रनमशीन विराट कोहली आणि भारतीय संघासाठी अतिशय खास होता. कारण आजच्या दिवशी विराट कोहलीचा वाढदिवस आहे. या खास दिनी विराटने शतक झळकावले असून अनेक विक्रम मोडित काढले आहेत.
Virat Kohli equals the legendary Sachin Tendulkar on his birthday!
He is now the joint-highest century-maker in ODI cricket 👊@mastercardindia Milestones 🏏#CWC23 | #INDvSA pic.twitter.com/zOvs7V8TEM
— ICC (@ICC) November 5, 2023
विराटने १२० चेंडूंचा सामना करताना १० चौकारांच्या मदतीने शंभर धावा फटकावल्या आहेत. या शतकी खेळीसह विराटने वनडे क्रिकेटमध्ये ४९ शतके झळकावण्याच्या सचिन तेंडूलकर याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विराटच्या शतकी खेळीसह भारतीय संघाने ३२६ धावा फलकावर लावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार
ठग सुकेशला अयोध्या मंदिरात दान करायचा आहे 11 किलो सोन्याचा मुकुट, तुरुंगातून लिहिलेले पत्र
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार का? जाणून घ्या समीकरण