Maharahstra Politics | बळीराजा उपाशी, घोटाळेबाज तुपाशी, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे टिकास्र

महाराष्ट्रातील (Maharahstra Politics) सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बळीराजा देशोधडीला लागला आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ठोस तरतूद केली नाही. धान, कापूस, सोयाबिन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. महागाईमुळे शेतकरी पिचला आहे. शेतमालाला हमीभाव नाही. परंतु घोटाळेबाजांना मात्र या राज्यात चांगले दिवस आले असल्याचे टिकास्र विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)  यांनी डागले आहे. त्याचबरोबर अपात्र अधिकाऱ्याना हवे ते पद देऊन सरकार हवी ती कामे करून घेत आहे. महत्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात नाहीत. या मनमानीमुळे राज्य अधोगतीकडे निघाले आहे. अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहे. मराठा विदर्भात गंभीर परिस्थिती आहे. तरी देखील सरकारची (Maharahstra Politics) डोळेझाक सुरू आहे. राज्यात घोटाळ्यांची मालिका सुरू आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणांची अंमलबजावणी नाही. विदर्भातील, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची, जनतेची फसवणूक केली आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घोटाळा, ठाणे येथील मोघरपाडा मेट्रोच्या कामात घोटाळा, रेट काँन्ट्रॅक घोटाळा, मिठागरांच्या जमिनींबाबतचा घोटाळा, जल जीवन मिशन घोटाळा, साडी घोटाळा, मोबाईल घोटाळा अशा घोटाळ्यांची मालिका राज्यात सुरू असून सरकारने या घोटाळ्यांमधील दोषींवर कारवाई केली पाहिजे. अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल