इव्हीएम आम्हाला नको असून मतपत्रिकेवरच मतदान घ्या – अशोक चव्हाण

Ashok Chavan

मुंबई/शिर्डी – महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Mahatma Gandhi, Pandit Jawaharlal Nehru, Dr. Babasaheb Ambedkar) यांचे विचार नष्ट होतात की काय असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटले आहे. शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित नवसंकल्प कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी जाहीर सभेत ते बोलत होते.

व्यासपीठावर प्रभारी एच के पाटील (HK Patil), प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सा. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुवा, संपतकुमार, सोनल पटेल, कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार हिरामण खोसकर, आमदार शिरीष चौधरी. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, लातूरचे अभय साळुंके, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन चौगुले, राजाराम पानगव्हाणे, डॉ. तुषार शेवाळे , दुर्गा तांबे यांच्यासह अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकार अपयशी ठरले असून हे अपयश झाकण्यासाठी ते धार्मिक प्रश्न उपस्थित करत आहेत. ज्ञानवापी, हनुमान चालीसा (Gyanvapi, Hanuman Chalisa) या प्रश्नांपेक्षा बेरोजगारीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या शिबिरात इव्हीएम (EVM) आम्हाला नको असून मतपत्रिका द्या असे सांगताना भारत जोडो अभियानातून काँग्रेस अधिक बळकट होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संजय बालगुडे (Sanjay Balgude) यांनी संपादित केलेल्या वाढत्या महागाई वरील महागाईचे गॅस कॅलेंडर या विशेष पुस्तिकेचे अनावरण व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

Previous Post
nana patole

‘काँग्रेसच्या विचारातून भारताला स्वातंत्र्य मिळाले, ज्या देशांमध्ये सुई बनत नव्हती त्या देशात रॉकेटची निर्मिती होऊ लागली’

Next Post
चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पार्टी राज्यसभेची तिसरी जागा १००% जिंकणारच – चंद्रकांत पाटील

Related Posts
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक, दारु घोटाळ्याप्रकरणी 8 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक, दारु घोटाळ्याप्रकरणी 8 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई

Manish Sisodia Arrests: सीबीआयने दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात दुसऱ्या फेरीच्या चौकशीनंतर रविवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना…
Read More
Sanket Khedkar | अभिनेता संकेत खेडकर साकारणार शनिदेवांची भूमिका.

Sanket Khedkar | अभिनेता संकेत खेडकर साकारणार शनिदेवांची भूमिका.

Sanket Khedkar | सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असते. आजवर पौराणिक, ऐतिहासिक, थरारक,…
Read More
Vijay Vadettiwar | मराठा समाजाच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली, विजय वडेट्टीवार यांचे सरकारवर टीकास्र

Vijay Vadettiwar | मराठा समाजाच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली, विजय वडेट्टीवार यांचे सरकारवर टीकास्र

Vijay Vadettiwar – महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा (Special Session) फार्स करून आज मराठा समाजाला (Maratha society) नोकरी आणि…
Read More