Narendra Modi | नरेंद्र मोदी गरिबांचे नाही तर अरबपतींचे नेते, सत्ता जाण्याची भितीने मोदी घाबरले

Narendra Modi | लोकसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर आक्रमण करून ते संपवण्याचे काम केले जात आहे. इंडिया आघाडी लोकशाही व संविधानाचे रक्षण करत असताना भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र संविधान व लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे त्यांचे लक्ष्य आहे. सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणार हे भाजपाचा खासदारच जाहीरपणे सांगत आहे. असे असले तरी संविधानला कोणतीही शक्ती बदलू शकत नाही. संविधान हे एक पुस्तक नसून गरीब, आदिवासी, दलित, सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकारांचा दस्ताऐवज आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी ते कोणालाही बदलू देणार नाही, असा खणखणीत इशारा काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी दिला आहे.

नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशातील २२ अरबपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. नोटबंदी करुन काळा पैसा बाहेर करण्याचे आश्वासन दिले पण याचा फायदाही मोदींच्या मित्रांनाच झाला. जीएसटीचे पैसे जनतेकडून वसूल करुन मुठभर उद्योगपतींच्या खिशात घातले. नरेंद्र मोदी हे अरबपतींचे नेते आहेत गरिबांचे नेते नाहीत. सत्ता जाण्याची भिताने नरेंद्र मोदी घाबरले आहेत आणि मोदी घाबरले की खोटे बोलण्यास सुरुवात करतात. इलेक्टोरल बाँडमधील भ्रष्टाचार पकडला गेल्याने मोदींची चिंता आणखी वाढली आहे.

नरेंद्र मोदी सरकार हे दलित, आदिवासी विरोधी आहे. आदिवासींना भाजपा वनवासी म्हणून अपमान करते. अयोध्यातील राम मंदिराच्या उद्घाटनात देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आहेत म्हणून बोलावले नाही तसेच संसदेच्या उद्घाटनालाही मोदी यांनी बोलावले नाही. भाजपा आदिवासी समाजावर अन्याय करते पण आदिवासी, दलित, मागासर्गीय, अल्पसंख्याक समाजाला सामाजिक न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष जातनिहाय जनगणना करणार व सामाजिक, आर्थिक सर्वे करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेईल, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच