‘मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते…! ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली’

मुंबई – शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (ED ) कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबागमधील (Alibaug ) आठ भूखंड आणि दादरच्या (Dadar) फ्लॅटचा समावेश आहे. एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली असल्याचं सांगितलं जातंय.

पत्राचाळ घोटाळ्यातील (Patrachaul scam) पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईचे आता राजकीय पडसाद उमटू लागले असून संपूर्ण महाविकास आघाडी आता राऊत यांचा बचाव करताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला विरोधक आक्रमक झाले असून राऊत यांच्या अटकेची मागणी करत आहेत.

दरम्यान, या घडामोडीवर आता मनसेचे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी देखील ट्वीट करत चिमटा काढला आहे. ते म्हणाले, मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते…! ED ने थेट राष्ट्रवादी च्या भोंग्यावरच कारवाई केली. असं म्हणत खोपकर यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.