दुपारी झोपू नये असे का म्हणतात ?

‘दुपारी झोपणं म्हणजे दारिद्र्याचं लक्षण’ असे आपले वरिष्ठ लोक सांगायचे. पण, यामागे काही वैज्ञानिक कारणं सुद्धा आहेत. ३ लाख लोकांच्या झोपण्याच्या सवयींचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हे सांगितलं आहे की, दुपारी जास्त वेळ झोपल्याने तुम्हाला हृदयाचा आजार होऊ शकतो आणि अकाली निधन सुद्धा होऊ शकतं. दुपारी ४० मिनिटांपेक्षा जास्त जर तुम्ही दुपारी झोपत असाल तर तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीला सामोरं जावं लागेल असं डॉक्टर सांगतात.

डायबेटिस आणि स्थूलपणा याचं सुद्धा प्रमुख कारण हे रोज दुपारी ४० मिनिटांपेक्षा जास्त झोपणे हे असू शकतं असं काही रिसर्च सांगतात. ६० मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त झोपणाऱ्या व्यक्तींना डायबेटिस २ या प्रकारच्या आजाराला समोरं जावं लागण्याची शक्यता ५०% ने अधिक वाढते. दुपारी जास्त वेळ झोपल्याने पचनाचे आजार सुद्धा होण्याची शक्यता जास्त असते असं तज्ञ सांगतात. त्यासोबतच छातीचे आजार होण्याचं प्रमाण सुद्धा ८२% ने वाढतं असं रिसर्च सांगतात. अकाली निधनाचं प्रमाण हे दुपारच्या झोपण्याने २७% ने वाढतं असं एका रिसर्च ने सांगितलं आहे.