IND VS SA Test : भारताचा दक्षिण अफ्रिकेवर ११३ धावांनी विजय, मालिकेत १-० ने आघाडी

सेंच्युरियन – सेंच्युरियन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव केला. यासह भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात विजयासाठी 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 191 धावांवर बाद झाला. टेंबा बाउमाने सर्वाधिक 35 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने २१ धावांचे योगदान दिले.

भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी तीन बळी घेतले. तर मोहम्मद सिराज आणि आर अश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारताने पहिल्या डावात 327 धावा केल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिकेला केवळ 197 धावांत गुंडाळले होते. अशा प्रकारे भारताने पहिल्या डावाच्या आधारे 130 धावांची आघाडी घेतली होती.

दुसऱ्या डावात भारताचा संघ केवळ 174 धावा करू शकला. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य होते. या कसोटीदरम्यानच मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमध्ये 200 बळी पूर्ण केले. भारतासाठी केएल राहुलने पहिल्या डावात शतक झळकावले आणि शमीने या कसोटीत एकूण आठ विकेट घेतल्या.