तुम्हाला ध्रुमपानाचे व्यसन आहे का ? मग हा जीवनविमा अवश्य करा

तुम्हाला ध्रुमपानाचे व्यसन आहे का ? मग हा जीवनविमा अवश्य करा . आपल्याकडे बहुतांश जणांना धूम्रपानाचे व्यसन असते. साहजिकच अशा व्यक्ती विमा कंपन्यांसाठी ‘जोखमी’च्या असतात. धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा आजार, कर्करोग, लिव्हरचा आजार होऊ शकतो .अशाप्रसंगी त्यामुळे त्यांना विम्याचे कवच देताना कंपन्यांकडून अधिक हप्ता आकारला जातो.
धुम्रपान करणार्‍या व्यक्तीसाठी 15970 रुपये हा हप्ता आकारला जातो. यानुसार धुम्रपान करणार्‍या व्यक्तीला 6530 रुपये अधिक भरावे लागतात. एकंदरीत सामान्य व्यक्तीपेक्षा धुम्रपानाचे व्यसन बाळगणार्‍या व्यक्तीला 44 टक्के अधिक हप्ता भरावा लागतो. धूम्रपानाची माहिती दिल्यानंतर तुम्ही किती वेळा धूम्रपान करता यावर विमा कंपनी हप्ता निश्चित करते. एखाद्या व्यक्तीने धूम्रपानाविषयीची माहिती दडवल्यास भविष्यात पॉलिसी रद्द करण्याचे अधिकारही कंपनीला असतात.