Sonam Kapoor | “..माझे पप्पा कधीही दारू पित नाहीत”, सोनम कपूरने सांगितले वडील अनिल कपूरच्या तंदुरुस्तीचे रहस्य

Sonam Kapoor – बॉलिवूड चे ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) वयाच्या ६७ व्या वर्षीही खूप तंदुरुस्त आहेत. फिटनेस राखण्यासाठी तो जिममध्ये तासनतास घाम गाळतात आणि हेल्दी डाएट चार्टही फॉलो करतात. आता त्यांच्या फिटनेसचे रहस्य त्याची मुलगी सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने उघड केले आहे.

सोनम कपूरने नुकतेच एका खाजगी कार्यक्रमात सांगितले की, माझे वडील आरोग्याबाबत खूप जागरूक आहेत. ते दारू पीत नाहीत, धूम्रपान करत नाही आणि कोणत्याही वाईट सवयीचा त्यांच्या दैनंदिन जीवनात समावेश करत नाहीत. अनिल कपूर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांचे फोटो शेअर करतात, कधी जिममध्ये वर्कआऊट करताना तर कधी पूलमध्ये आंघोळ करतानाचे फोटो शेअर करतात, त्यांच्या रोजच्या चांगल्या सवयींमुळे ते आजही इतके फिट आहे, असे सोनम कपूरने सांगितले आहे.

कुटुंबातील प्रत्येकजण आरोग्याबाबत जागरूक
सोनम कपूर म्हणाली, माझे काका बोनी कपूर त्यांचे आयुष्य एन्जॉय करतात. त्यांना अन्न खूप आवडते आणि कधीकधी ते दारू देखील पितात. प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असूनही ते सर्वजण आरोग्याबाबत जागरूक आहेत. ते स्वतःची काळजी घेतात.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

दरम्यान अनिल कपूर सध्या ॲनिमल चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात ते रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत होते. या चित्रपटात वडील अनिल कपूर आणि मुलगा रणबीर कपूर यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Lok Sabha Elections 2024 | भाजप उमेदवारांची पहिली यादी आठवडाभरात येणार; जाणून घ्या कुणाचा असेल यात समावेश

अजय बारसकरवर महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणाचा दवाब आणला, सरकारने हा ट्रॅप रचला – Manoj Jarange

MNS-BJP Alliance | मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या?