रात्री लाईट चालू ठेवून झोपणे आरोग्यासाठी घातक; होऊ शकतं डिप्रेशन, हृदयासंबंधी समस्याही…

Sleeping While Light On: जर तुम्हीही रात्री लाईट लावून झोपत असाल तर आरोग्य तज्ञांच्या मते ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. तरुण-तरुणींनी चांगल्या आरोग्यासाठी 8 तासांची झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीसाठी, चांगली झोप ही थेरपीसारखी असते जी तुम्हाला शरीराच्या संपूर्ण थकव्यापासून आराम देते. शांत झोपेने तुमचा मेंदू व्यवस्थित काम करतो. तसेच स्नायू रिकव्हर करते. चांगल्या झोपेमुळे मूड चांगला राहतो. तसेच अनेक आजारांचा धोका कमी होतो. परंतु झोपताना आपण काही खबरदारी पाळली पाहिजे, अन्यथा यामुळे शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

झोपताना तुम्हीही करता का या चुका?
अनेकांना झोपताना खोलीतील सर्व लाईट बंद करण्याची सवय असते जेणेकरून त्यांना झोपताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. पण काही लोक हे अजिबात करत नाहीत. काही लोकांना लाईट लावून झोपायला आवडते किंवा काही लोक आळशीपणामुळे लाईट बंद करत नाहीत. पण तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, झोपताना लाईट चालू ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

लाईट चालू ठेवून झोपल्याने हे नुकसान होते

नैराश्य
निरोगी जीवनशैलीसाठी प्रकाश जितका आवश्यक असतो तितकीच अंधाराचीही समान भूमिका आहे. स्वीडन आणि नॉर्वे सारख्या देशांमध्ये उन्हाळ्याच्या हंगामात सुमारे ६ महिने सूर्य मावळत नाही हे तुम्ही अनेकदा वाचले असेल. त्यामुळे येथील अनेक लोक डिप्रेशनचे बळी ठरतात. तर भारतात ज्यांना प्रकाशात झोपायची सवय असते ते यासाठी इलेक्ट्रॉनिक लाईट्स वापरतात. परंतु इलेक्ट्रॉनिक लाईट्समधून निघणारा निळा प्रकाश तुम्हाला चिडचिडा करू शकतो.

अनेक आजारांचा धोका असतो
जर तुम्ही लाईट लावून झोपलात तर तुम्हाला शांत झोप येत नाही. यासोबतच अनेक आजारांचा धोका असतो. जसे- उच्च रक्तदाब, हृदयाची समस्या. म्हणूनच चुकूनही लाईट लावून झोपू नये.

थकवा
असे मानले जाते की लाईट लावून झोपल्याने झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसून येतो. यामुळे तुम्हाला ऑफिसची कामे करण्यात अडचण येऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला सुस्त आणि थकल्यासारखे वाटू शकता.