पंजाबच्या फलंदाजांचा वार अन् फिकी पडली अर्जुनच्या गोलंदाजीची धार! एकाच षटकात लुटल्या ३१ धावा

मुंबई- पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (PBKS vs MI) वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याची चांगलीच धुलाई झाली. डावाच्या १६व्या षटकात पंजाबच्या फलंदाजांनी अर्जुनविरुद्ध ३१ धावा ठोकल्या. त्यात नो बॉल आणि वाइड बॉलचाही समावेश आहे. आपल्या सटिक यॉर्करने आयपीएलप्रेमींना प्रभावित करणारा अर्जुन पंजाबविरुद्ध महागडा गोलंदाज ठरला. एकाच षटकात ३१ धावा लुटत तो मुंबईकडून सर्वात महागडे षटक टाकणारा दुसरा गोलंदाज बनलाय. आम्ही तुम्हाला मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या आयपीएलमधील ५ सर्वात महागड्या ओव्हर्सबद्दल सांगत आहोत…

पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबईकडून अर्जुनने १६ व्या षटकात सर्वाधिक धावा लुटल्या. त्याच्या या षटकातील पहिल्याच चेंडूवर पंजाबचा कर्णधार सॅम करनने षटकार ठोकला. परिणामी दबावात आलेल्या अर्जुनने दुसरा वाइड टाकत एक अधिकची धाव दिली. त्यानंतर पुढील चेंडूवर सॅम करनने पुन्हा चौकार लगावला. पुढे १ धाव काढल्यानंतर हरप्रीत सिंगने चौथ्या चेंडूवर चौकार आणि पाचव्या चेंडूवर षटकार लगावला. सहावा व शेवटचा चेंडू नो बॉल गेला, ज्यावर हरप्रीतने चौकार मारला. अखेर पुन्हा सहावा चेंडू टाकण्यात आला आणि हा चेंडूही हरप्रीतने सीमापार टोलवला. अशाप्रकारे या षटकात अर्जुनने ३१ धावा दिल्या.

यासह अर्जुन मुंबईकडून सर्वात महागडे षटक टाकणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. (Most Expensive Over By MI Bowler)

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाची सर्वात महागडी षटके:
३५- डॅनियल सॅम्स विरुद्ध केकेआर, पुणे, २०२२
३१ – अर्जुन तेंडुलकर विरुद्ध पंजाब, मुंबई, आज
२८ – पवन सुयाल विरुद्ध आरसीबी, मुंबई, २०१४
२८ – अल्झारी जोसेफ विरुद्ध राजस्थान, मुंबई, २०१९
२८- मिचेल मॅकक्लेनाघन विरुद्ध पंजाब, इंदूर, २०१७