PM Narendra Modi हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार?

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अचानक सुरू झाली आहे. खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीचा पत्ता नसताना थेट २०२४ च्या पुणे लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.

मोदींसाठी पुणे लोकसभा मतदारसंघाची चाचपणीसुद्धा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता उत्तरप्रदेशनंतर मोदींचे मिशन महाराष्ट्र असणार का? अशी चर्चा आता सुरु आहे. यातच आता माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी मोदींना लिहलेले एक पत्र देखील समोर आले असून त्यांनी मोदींना पुण्यातून निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.

ते पत्रात मोदींना विनंती करत म्हणतात, जेव्हा तुम्ही गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवली तेव्हा त्या राज्यात ९० ते १०० टक्के भाजपाला यश मिळाले. पुण्यात तुमचा विजय १०० टक्के असून राज्यातही ९० ते १०० टक्के भाजपाचे असेल.