IPL Auction Live: विलियम्सन बनणार हार्दिक पंड्याचा हुकुमी एक्का! गुजरात टायटन्सने इतक्या कोटींना घेतले विकत

IPL Auction Live: इंडियन प्रीमियर लीग २०२३चा मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) आज (२३ डिसेंबर) केरळच्या कोची येथे सुरू आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता या लिलावाची सुरुवात झाली.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याला गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाने विकत घेतले. विलियम्सन हा प्रतिभाशाली फलंदाज असून तो २ कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. त्याच्यावर फक्त गुजरात टायटन्स संघाने बोली लावली आणि २ कोटींच्या मूळ किंमतीत विकत घेतले. विलियम्सन गतवर्षी सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार होता. परंतु यंदाच्या हंगामापूर्वी हैदराबाद संघाचे त्याला रिलीज केले होते.

दरम्यान गतवर्षीची विजेती फ्रँचायझी गुजरात टायटन्सपासून (Gujrat Titans) आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सपर्यंत (Mumbai Indians) सर्व १० फ्रँचायझींचे संघमालक ऑक्शन टेबलवर बसून संघ मजबूत बनवताना दिसत आहेत. लिलावात एकूण ४०५ खेळाडू सहभागी झाले असून त्यांपैकी २७३ भारतीय, १३२ परदेशी आणि ४ खेळाडू असोसिएट देशांचे आहेत. आयपीएल फ्रँचायझी या ४०५ पैकी केवळ ८७ खेळाडूंना विकत घेतील. काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीच्या पर्समध्ये सर्वाधिक ४२.२५ कोटी रुपये आहेत. तर शाहरुख खानच्या मालकीचा कोलकाता नाईट रायडर्स संघ सर्वात कमी ७.०५ कोटींसह लिलावात उतरला आहे.