Nagpur News | बापरे बाप, एका घरात सापडले तब्बल २६ साप; नागपूरमधील घटनेने परिसरात खळबळ

साप या सरपटणाऱ्या प्राण्यात पाहून अनेकांना घाम फुटतो. कुणाच्या घरात साप दिसला तर रात्रीची झोप उडते. मात्र नागपूर मधील (Nagpur News) एका घरात एक-दोन नव्हे तब्बल २६ साप आढळले आहेत. भिलगाव कामठी येथील बिसन गोंडाणे याच्या घरी सापांची तब्बल २६ पिल्ले आढळून आली आणि संपूर्ण गावात खळबळ उडाली.

गोंडाणे यांना घरी दोन साप दिसल्याने कुटुंबीय खूप घाबरले. त्यांनी तातडीने वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटीचे सदस्य सर्पमित्र सागर चौधरी यांना ही माहिती दिली. ते सर्पमित्रांना घेऊन घटनास्थळी (Nagpur News) पोहचले. सापांना पकडण्यास सुरुवात केली.

थोडा कचरा काढल्यानंतर सागरला सापाची आणखी पिल्ले दिसली. हे साप बिनविषारी आणि पांदीवड प्रजातीचे साप होते. अथक परीश्रमानंतर एक एक करून तब्बल सव्वीस साप त्यांनी पकडले. कुटुंबीयांनीही सुटकेचा निःश्वास टाकला. या पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ