Anand Paranjape | आव्हाडांच्या ‘त्या’ म्होरक्यावर गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी, आनंद परांजपे यांनी केला भंडाफोड

Anand Paranjape | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड हे कायमचं हवेत बोलून फुगा फुगवल्याचा आव आणतात, असा टोला लगावत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावर त्यांनी केलेल्या आरोपांचा भंडाफोडचं आज पक्षाचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी केला. आव्हाड यांनी ज्या मोहसीन उंदरेच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत बेताल आरोप केले त्या आव्हाडांचा म्होरक्या मोहसीन उंदरे याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिस ठाण्यातील कागदपत्रे सादर करत परांजपे यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजभूषण श्रीवास्तव आणि प्रवक्ते संजय तटकरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना परांजपे म्हणाले की, ज्या खासगी शैक्षणिक संस्थेच्या कथित प्रकरणावरून आव्हाड यांनी आरोप केले त्या संस्थेशी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा काहीही संबध नाही. पण या प्रकरणात आव्हाडांचा म्होरक्या असलेले उंदरे यांच्यावर मात्र 376 सारखा आणि पासपोर्ट साठी खोटी माहिती पुरवल्याचा गंभीर गुन्हा नोंद आहे. यावरूनच उंदरे यांची मानसिकता आणि आव्हाड यांची पात्रता काय आहे हे समोर येते.

अर्धवट माहितीवरून जितेंद्र आव्हाड बिनबुडाचे आरोप करण्यात माहिर आहेत. असा टोलाही परांजपे यांनी लगावला. खोटे बोल पण रेटून बोल या कलाकारीत आव्हाड सुपरस्टार कलाकार आहेत. अशी झणझणीत टीका त्यांनी केली. अल्पसंख्याक समाजाचा पुळका घेवून आपणचं तारणहार असल्याचा आव्हाड यांचा बुरखा आम्ही विधानसभा निवडणूकीत फाडू. मुंब्र्यातील कोकणी अल्पसंख्यांक समाजाला वेठीस धरून आव्हाड यांनी केलेल्या अन्यायाच्या कथा मांडणार असा इशाराही परांजपे यांनी यावेळी दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ