Wipro New CFO: विप्रोच्या नवीन सीएफओ अपर्णा अय्यर कोण आहेत?

Wipro New CFO: देशातील चौथी सर्वात मोठी कंपनी विप्रोने आपल्या नवीन सीएफओची घोषणा केली आहे. अपर्णा अय्यर (Aparna Iyer)
यांची नवीन मुख्य आर्थिक अधिकारी करण्यात आली आहे. यापूर्वी हे पद जतिन दलाल (Jatin Dalal) यांच्याकडे होते, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतरही जतिन दलाल 30 नोव्हेंबरपर्यंत या पदावर राहणार आहेत.

विप्रोची स्थापना 1945 मध्ये अझीम प्रेमजी यांनी केली होती. त्यांची एकूण संपत्ती 11.5 अब्ज डॉलर्स आहे. मनीकंट्रोलच्या मते, या दिग्गज कंपनीची बाजारपेठ 218,790 कोटी रुपयांची आहे. शुक्रवारी विप्रोच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची घसरण दिसून आली. अपर्णा अय्यर आता CFO म्हणून मोठी जबाबदारी स्वीकारणार आहेत. चला जाणून घेऊया कोण आहेत अपर्णा अय्यर?

अपर्णा अय्यर 20 वर्षांपासून विप्रोशी संबंधित आहेत आणि त्यांनी वरिष्ठ अंतर्गत लेखापरीक्षक म्हणून काम केले आहे.त्या 2003 पासून या कंपनीशी संबंधित आहेत आणि पात्रतेनुसार,त्या सनदी लेखापाल आणि 2002 CA बॅचची सुवर्णपदक विजेत्या आहेत. अय्यर यांनी 2001 मध्ये मुंबईतील नरसी मोंजी येथून वाणिज्य पदवी प्राप्त केली.

अर्पणा यांनी गेल्या 20 वर्षात अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये अंतर्गत ऑडिट, व्यवसाय वित्त, वित्त नियोजन आणि विश्लेषण आणि कॉर्पोरेट ट्रेझरी यांचा समावेश आहे. विप्रोने स्टॉक एक्स्चेंजच्या खुलाशात म्हटले आहे की अय्यर मुख्य कार्यकारी थियरी डेलापोर्ट यांना अहवाल देतील आणि विप्रोच्या कार्यकारी मंडळात सामील होतील.

या वर्षी विप्रो सोडणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मुख्य संचालन अधिकारी संजीव सिंह यांचा समावेश आहे. याशिवाय कंट्री हेड सत्य इसवरन, एसव्हीपी आणि अमेरिकेचे हेल्थ केअर आणि मेडिकल प्रॉडक्ट्सचे प्रमुख मोहम्मद हक यांनी राजीनामा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई महापालिकेचे भूखंड व उद्याने दत्तक देण्याचे धोरण रद्द करा; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

वंचित बहुजन आघाडीचा Gautam Adani – Sharad Pawar भेटीवरून कॉंग्रेसला टोला !

ससूनमधील रुग्णांना ‘Virtual Reality’द्वारे ‘दगडूशेठ’ बाप्पाचे दर्शन