Anand Mahindra | आनंद महिंद्रा यांनी पाळला शब्द, क्रिकेटपटू सरफराज खानच्या वडिलांना भेट दिली ‘ थार’

भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी अलीकडेच टीम इंडियासाठी पदार्पण केलेल्या सरफराजचे वडील नौशाद खान यांना दिलेले वचन पूर्ण केले आहे. सरफराजचे वडील नौशाद खान यांना आनंद महिंद्रा यांनी थार भेट दिली आहे. सरफराज खानने त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर सरफराज खानने इंग्लंड मालिकेत भारताकडून पदार्पण केले. सरफराजच्या पदार्पणाच्या निमित्ताने वडील नौशाद खान भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते. वडिलांच्या मेहनतीने प्रेरित होऊन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी नौशाद खान यांना थार देण्याची घोषणा केली होती, जी त्यांनी आता पूर्ण केली आहे.

जेव्हा सरफराज खानचे वडील नौशाद खान यांना ही भेट मिळाली तेव्हा नौशाद खान व्यतिरिक्त सरफराज खान आणि त्यांचे दोन लहान भाऊही उपस्थित होते. सरफराज खानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये थार कारसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. सरफराज खानने इंस्टाग्राम पोस्टद्वारे महिंद्रा ऑटोचे आभार मानले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज