Bacchu Kadu | 2 कोटीच्या गाडीत फिरायचं आणि 17 रुपयांची साडी वाटायची; बच्चू कडूंचा नवणीत राणांवर हल्ला

Bacchu Kadu | अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर पुन्हा एकदा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी हल्ला चढवला. राणा दाम्पत्याने मेळघाटमध्ये आदिवासी महिलांना निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटल्या होत्या, ज्यावरुन त्यांच्यावर भरपूर टीकाही झाली होती. त्यावरून आता बच्चू कडूंनी त्यांचा समाचार घेतला आहे.

2 कोटीच्या गाडीत फिरायचं आणि 17 रुपयाच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका, असा टोला यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला लगावलाआहे. 17 रूपयाची साडी मत परिवर्तन करू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. ते अमरावतीतील प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत बोलत होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका