Abhay Patil | काँग्रेसने अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांविरोधात उतरवला उमेदवार, अभय पाटील यांना दिलं तिकीट

Abhay Patil | रविवारी रात्री उशीरा काँग्रेसने त्यांची दहावी यादी जाहीर केली. २ उमेदवारांचा समावेश असलेल्या या लोकसभा यादीत महाराष्ट्रातील अकोल येथून डॉ. अभय पाटील (Abhay Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता अकोल्यात भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला सात जागांवर विना अट पाठींब्याची घोषणा केली होती. त्यांपैकी दोन मतदारसंघांना पाठींबा जाहीर केला आहे. असे असूनही काँग्रेसने अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांविरोधात आपला उमेदवार उतरवला आहे. तसेच अकोल्यात महायुतीकडून म्हणजेच भाजपकडून अनुप धोत्रे, जे माजी केंद्रीय मंत्री तसेच विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र आहेत, यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अकोल्यात तिरंगी लढत पाहायला मिळेल.

दरम्यान येत्या 4 एप्रिल रोजी काँग्रेस नेते आणि इतर आघाडीतील पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अभय पाटील हे नामाकांन अर्ज दाखल करणार आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका