Chandrakant Patil Accident | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात, पोलिसांची गाडीच कारवर आदळली

MLA Chandrakant Patil Accident | लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी गावभेटींचा धडाका लावला आहे. यादरम्यान नेत्यांच्या अपघाताच्या बातम्याही समोर येत आहेत. काल मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात त्यांना किरकोळ जखम झाली असल्याचे समजत आहे. अपघातानंतर त्यांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Accident) यांच्याच ताफ्यातील दोन गाड्या एकमेकांवर आदळल्यामुळे ही दुर्घटना घडली. या अपघातामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासह सुरक्षा वाहनातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे समजत आहे.

या दुर्घटनेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मुक्ताई नगरवरून आम्ही जुना कुंड रस्त्याने जात असताना काही शेतकरी आपल्यासाठी रस्त्यावर थांबून होते. त्यांना पाहून आपण चालकाला आपली गाडी थांबविण्यास सांगितले. आमची गाडी रस्त्यावर थांबली होती. मात्र, त्यावेळी आमच्याच ताफ्यामध्ये असलेली सुरक्षारक्षकांच्या गाडीचा ब्रेक न लागल्याने ती आमच्या कारवर जोरात आदळली. यामध्ये मला आणि तीन पोलीस कर्चमाऱ्यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या मुक्ताईनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका