वैचारिक स्वैराचार म्हणजे उद्धव ठाकरे यांचे राजकारण; आमदार आशिष शेलार यांची टीका 

मुंबई – ज्या उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आयुष्यभर वैचारिक स्वैराचार केला, अशा उद्धवजींना भाजपावर (BJP) बोलण्याचा अधिकारच नाही.महाराष्ट्रात किंबहुना 90 च्या दशकानंतर ज्यांच्या वैचारिक स्वैराचाराचे उदाहरण कु पद्धतीने दिले जाईल असा, राजकीय व्यवहार म्हणजे उद्धवजींचे राजकारण होय. मला सर्व गोष्टी मांडायच्या नाहीत पण स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या कुटुंबामध्ये, स्वतःच्या पक्षामध्ये, स्वतःच्या सरकारमध्ये ज्यांना सलग अपयश आले. त्यांनी भाजपाला शिकवू नये. अशी टीका आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे.

ते स्वतःचे कुटुंब सुद्धा एकत्र टिकवण्यात अपयशी ठरले. स्व पक्षातील नेते सोडून गेले, त्यांना एकत्र ठेवण्यामध्ये अपयश आलं,  स्वतःच सरकार टिकवण्यामध्ये, स्वतःचे मंत्री एकत्र ठेवण्यामध्ये ज्यांना अपयश आलं त्या उद्धवजींनी केवळ आयुष्यामध्ये वैचारिक स्वैराचार केला. त्यांनी भारतीय जनता पक्षाला हे टोमणेने आणि उदाहरणे देण्याची आवश्यकताच नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. उध्दव ठाकरे यांनी

भाजपाला बाहेरख्याली म्हटले होते त्यावर माध्यमांंनी विचारलेल्या प्रश्नांवर ही प्रतिक्रिया आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.