कर्नाटकात बजरंग दलाच्या 23 वर्षीय कार्यकर्त्याची हत्या; राजकीय वातावरण तापले

बंगरूळ – कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या २३ वर्षीय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री शिवमोग्गा जिल्ह्यात हर्षा नावाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर परिसरात तणाव असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 23 वर्षीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या कथित भोसकल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी दोन आरोपींना अटक केल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, पोलीस बंदोबस्तात सोमवारी शवविच्छेदनानंतर हर्षा च मृतदेह घरी नेण्यात येत आहे. अनेक हिंदू संघटनांचे कार्यकर्तेही रुग्णवाहिकेच्या मागे फिरत आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये राज्य सरकारने या हत्येचा हिजाब वादाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती कॉलनीतील रवि वर्मा गल्लीत रविवारी रात्री उशिरा हर्षा नावाच्या 23 वर्षीय तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. त्याच्यावर अनेकवेळा चाकूने हल्ला झाल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याचवेळी या घटनेनंतर मृताच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला. खबरदारी म्हणून पोलिसांनी शहरात कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.