Shivajirao Adhalarao Patil | “विद्यमान खासदार गल्ली फिरायचं नाही म्हणतात, पण गल्लीतली माणसंच…”, शिवाजीदादांचा कोल्हेंना टोला

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढलराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी जुन्नर गावभेट दौऱ्या दरम्यान पिंपळगाव सिद्धनाथला भेट दिली. यावेळी गावातील पदाधिकाऱ्यांनी फेटा बांधून औक्षण करून आत्मिय स्वागत केले. तसेच त्यांची बैलगाडीतून रॅली काढण्यात आली. यावेळी जेसीबीतून दोन्ही बाजूला फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर श्री समर्थ मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात आपल्याला असा खासदार निवडून देण्याची गरज आहे जो आपले प्रश्न दिल्लीत मांडेल. आणि दिल्लीतून निधी आणून आपल्याला मतदार संघाचा विकास करेल, असे शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी म्हटले.

पुढे बोलताना ते म्हणाले, या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने विकासाच्या गोष्टी करायला पाहिजे, पण टीका करण्यावर भर दिला जातोय. विद्यमान खासदार गल्ली फिरायचं नाही म्हणतात पण ते विसरून जातात की, गल्लीतली माणसं तुम्हाला दिल्लीत पाठवत असतात. जुन्नर तालुक्यातील विकास कामे फक्त कागदावर आहेत. मला ते प्रत्यक्षात उतरवायचे आहेत. पर्यटनासाठी जुन्नर तालुका सक्षम पर्याय आहे. पर्यटन म्हणून अनेक प्रकार निधी आपण आपल्या तालुक्यात आणू शकतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

या प्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष पांडुरंग पवार, तालुकाप्रमुख भाजपा संतोष नाना खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे, पिंपळगाव सरपंच विक्रम खंडागळे, उपसरपंच उज्वलाताई खंडागळे, गोळेगाव सरपंच सुनीताताई मोदे, उपसरपंच हर्षल जाधव, कुमशेत सरपंच रवीशेठ डोके, उपसरपंच निर्मलाताई डोके, अलदरे सरपंच सविताताई सरजने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच