‘महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात’

जालना – निवडणुका लागल्या की महाविकास आघाडीतील आमदार भाजपामध्ये येतील, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपात येतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य दानवे यांनी केलंय. ते एबीपी माझाशी बोलत होते.

ज्यांची मौत आलीय, ते खड्ड्यात जातील. भाजपमध्ये असे कोणीच नाहीत ज्यासाठी हे खड्डे खोदू शकतील, खोदता खोदता त्यांच्याच अंगावर न पडो अशीही टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे. मविआचे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावं सांगून त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही असंही ते म्हणाले.

रावसाहेब दानवे पुढे म्हणाली की, दाऊद इब्राहिमसारख्या बॉम्ब स्फोटातील आरोपीच्या पाठीमागे उभा राहणारा, त्याच्याशी फायनांशियल डिलिंग करणारा मंत्री जेलमध्ये गेला. तरीही त्यांचा राजीनामा न घेणाऱ्या आघाडीची अरेरावी राज्यातील जनतेला सहन होणार नाही. भगवाधारी सगळे फक्त आमच्याकडेच आहेत.