कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी होणारी पोटनिवडणूक लढणार ‘आप’ लढवणार 

कोल्हापूर – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे विजयी झाले होते. मात्र डिसेंबर महिन्यात त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आता या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. भाजपने ही निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली असून महाविकास आघाडी देखील ही जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.

पंजाबमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला आम आदमी पक्ष आता महाराष्ट्रातही शिरकाव करु पाहत आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणूक ‘आप’ संपूर्ण ताकदीने लढणार आहे. ‘आप’कडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी दिली. TV9 मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 17 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडेल, तर 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.राजकीय जाणकारांच्या मतानुसार ही पोटनिवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.