आता खैर नाही : ४८ तासात ३ दहशतवादी मारले; सुरक्षा दलाने दिली माहिती

बारामुल्ला : जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील करहामा गावात आज पहाटे झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी ठार झाला. करहामा मधल्या कुंजर भागात अतिरेकी असल्याच्या माहितीवरून पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांनी या भागात संयुक्तपणे शोध मोहीम सुरु केली होती.

ठार झालेला दहशतवादी कुलगाम इथला आहे. येत्या २२ ते २४ मे दरम्यान होणाऱ्या जी २० बैठकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक दक्ष झाली आहे. सुरक्षा दलाला मिळत असलेल्या माहिती वरून गेल्या ४८ तासात ३ दहशतवादी मारले गेले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक आमोद नागपोर यांनी पत्रकारांना दिली.