68th National Film Award : मराठीमध्ये ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाने मारली बाजी, अजय देवगण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

नवी दिल्ली – 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (68th National Film Award) काल जाहीर करण्यात आले. तानाजी द अनसंग वॉरियर (Tanhaji The Unsung Warrior) हा चित्रपट सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट ठरला, तर गोष्ट एका पैठणीची (Goshta Eka Paithanichi) हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून काल नवी दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

अभिनेता अजय देवगण आणि तमिळ अभिनेता सूर्या (Actor Ajay Devgn and Tamil actor Suriya) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (Best Actor Award) विभागून जाहीर झाला आहे. सिद्धार्थ मेनन अभिनीत ‘जून’, किशोर कदम अभिनीत अवांछित’, ‘गोदाकाठ’ हे चित्रपट विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून गौरवण्यात आले आहेत. सुमी या मराठी चित्रपटाला उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘टकाटक’ (Takatak) या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी अनिश गोसावी (Anish Gosavi), तर ‘सुमी’ (Sumi) या चित्रपटातील भूमिकेसाठी आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर (Akanksha Pingle, Divyesh Indulkar) यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘फनरल’ हा मराठी चित्रपट सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. चित्रपट स्नेही राज्याचा पुरस्कार मध्यप्रदेशला जाहीर झाला आहे. सायना चित्रपटातल्या गीतांसाठी गीतकार मनोज मुंतशीर (Lyricist Manoj Muntsheer) यांना सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार जाहीर झाला आहे. तर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे (Singer Rahul Deshpande) यांना मी वसंतराव या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार जाहीर झाला आहे.