Balasaheb Thorat | भाजपाला हद्दपार करणे हे लक्ष्य, आघाडी म्हणून साथ दिली पाहिजे

Balasaheb Thorat | २०१४ नंतर आलेले भाजपाचे सरकार वेगळ्या वाटेवर गेले, पुढच्या कालखंडात लोकशाही, राज्यघटना राहणार का बदलणार? देश वेगळ्या वळणावर जाईल का? अशी ही ऐतिहासिक निवडणूक आहे, असे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मेळाव्यात ते बोलत होते.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, देश हुकूमशाहीकडे चालला आहे, राज्यघटना पायदळी तुडवली, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. निवडणुका लागल्यानंतर काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवली. देशातील राजकीय परिस्थितीचा विचार करुन विरोधी पक्ष एकत्र आले व इंडिया आघाडीची स्थापना केली. राज्यातही महाविकास आघाडी स्थापन करून एकत्रित निवडणुकीला सामोरे जात आहे. पहिल्या टप्प्यातील चित्र सकारात्मक दिसले आहे, भाजपाला रोखणे हे आपले लक्ष्य आहे. तीन पक्षांच्या जागा वाटपाचे काम सोपे नव्हते. सांगलीच्या जागेसाठी सर्व बाजूंनी दबाव होता, खूप चर्चा झाली. सांगलीच्या जागेसाठी दिल्लीतूनही प्रयत्न केला परंतु यश आले नाही. भाजपाला हद्दपार करण्याच्या उद्देशाने आघाडी म्हणून साथ दिली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत, सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सांगली जिल्ह्याचे निरीक्षक माजी मंत्री रमेश बागवे यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच