पुण्यातील डेक्कनमध्ये साकारले प्रभू श्रीरामाचे ७ फुटी शिल्प, किरण साळी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

Ram Mandir Pranpratishtha: अयोध्येत ५०० वर्षांनंतर प्रभू श्रीराम विराजमान झाले. पुणे शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत रामलल्लाच्या लोकार्पण सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला डेक्कन येथील कलाकार कट्ट्यावर श्रीरामांचे ७ फुटी शिल्प साकारण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र युवासेना सचिव किरण साळी यांनी केले होते.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्ती निमित्त शिवसेनेचे मुख्यनेते लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच युवा नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या माध्यमातून हे ७ फुटी प्रभू श्रीराम शिल्प साकारण्यात आले. आजवर २०० पेक्षा अधिक शिल्प सकारणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिल्पकार सुरेश राऊत यांनी ७ फुट भव्य व आकर्षक असे शिल्प सलग ५ तासात तयार केले. हजारो पुणेकर श्रीराम भक्त हे शिल्प प्रत्यक्षात निर्माण होताना बघून मंत्रमुग्ध झाले. ‘जय श्रीराम’ च्या जयघोषाणे डेक्कन परिसरात नव चैतन्य निर्माण झाल्याचा अद्भुत भाव पुणे शहरातील सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, क्षेत्रातील मान्यवरांनी अनुभवला.

दो धागे श्रीराम के नाम या अभियानाच्या प्रमुख अनघा घैसास यांनी देखील या कार्यक्रमास भेट दिली व आयोजनाबद्दल युवासेनेला शाबासकीची थाप देत शुभेच्छा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

लज्जास्पद! शेजाऱ्याने मुलीला खोलीत बंद करून मारहाण केली, तिला वाचवायला गेलेल्या आईलाही सोडले नाही

एलॉन मस्कची लवकरच भारतात एन्ट्री, मिळणार परवाना; जिओ आणि एअरटेलशी थेट स्पर्धा

भारतरत्न प्राप्तकर्त्याला पदकासोबत किती पैसे मिळतात? याच्याशी संबंधित सर्वकाही जाणून घ्या