‘चंद्रकांत खैरे याचं डोकंच आता गोमूत्राने धुवायला पाहिजे’

औरंगाबादः शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) यांचं डोकंच आता काही काम करत नाहीये. पैठणच्या सभेतील गर्दी पाहून त्यांना काही सूचत नाहीये. त्यामुळे खैरेंचं डोकंच आता गोमूत्राने धुवायला पाहिजे, असं वक्तव्य रोहयो मंत्री संदिपान भूमरे (Sandipan Bhumre) यांनी केलंय.

शिंदे गटातील पैठणचे आमदार आणि मंत्री संदिपान भूमरे यांच्या नेतृत्वात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा पैठणमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. मात्र मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या रस्त्यावरून गेला, त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून रस्त्याचे शुद्धीकरण केले. शिवसैनिकांचं हे निषेधात्मक आंदोलन राज्यभरात चर्चेचा विषय ठरलं. मात्र चंद्रकांत खैरेंचं डोकंच एकदा गोमूत्राने धुवायला पाहिजे, असं प्रत्युत्तर संदिपान भूमरेंनी दिलंय.