मनोज जरांगे पाटील मनुवादी, मनुवादी लोकांना आरक्षण देऊ नये; लक्ष्मण माने यांचे वक्तव्य

Laxman Mane: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुढाकाराने दुग्धव्यवसाय, कुकूटपालन, शेतीचे विविध प्रयोग सर्वप्रथम बारामतीत आणि त्यानंतर राज्यात राबविले गेले. राज्यात महिला आरक्षण, मंडल आयोग, उद्योग व्यवसाय पवारांच्या पुढाकाराने आले. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांनी कृतघ्नपणा थांबवून पवारांच्या माध्यमातून झालेल्या बारामतीसह महाराष्ट्राच्या विकासाचा पाया समजून घ्यावा, अशी टीका उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत माने बोलत होते.

मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलही पत्रकार परिषदेत लक्ष्मण माने यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील हे मनुवादी आहेत. त्यांच्या कार्यक्रमात एकाही ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचा फोटो नसतो. शिवाजी महाराजांचा फोटो असतो, पण तेही त्यांना कळाले नाहीत. जे कुणी मनुवादी असतील त्यांना आरक्षण देऊ नये. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आरक्षण देत होते, तेव्हा त्यांनी मिशा वर पिळल्या. मनुवादी विचार डोक्यात होता म्हणून त्यांनी आरक्षण नाकारले. पंजाबराव देशमुखांनी आरक्षण घेतले, त्यामुळे विदर्भ व कोकणातील लोकांना कुणबींचा आरक्षणाचा लाभ मिळाला. गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. याला आमचा विरोध नाही, मात्र त्यांना आमच्या‌ ताटातले देवू नका, त्यांना वेगळे आरक्षण द्यावे. आम्ही भिकारीच आहोत. ते भिकारी का झाले, याचा विचार त्यांनी करावा. सध्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांच्या हाताखाली काम करावे लागते, असे तुच्छतेने म्हणता तर मग आमच्यात का आरक्षण मागता? असाही सवाल लक्ष्मण माने यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

लज्जास्पद! शेजाऱ्याने मुलीला खोलीत बंद करून मारहाण केली, तिला वाचवायला गेलेल्या आईलाही सोडले नाही

एलॉन मस्कची लवकरच भारतात एन्ट्री, मिळणार परवाना; जिओ आणि एअरटेलशी थेट स्पर्धा

भारतरत्न प्राप्तकर्त्याला पदकासोबत किती पैसे मिळतात? याच्याशी संबंधित सर्वकाही जाणून घ्या