संतापजनक : ११ वर्षीय बालिकेवर नऊ नराधमांचा बलात्कार 

नागपूर – नागपुरात नऊ जणांनी ११वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार (Gang rape of 11-year-old minor girl) केला. ही खळबळजनक घटना उमरेड येथे उघडकीस आली. उमरेड पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली आहे.

19 जून रोजी रोशन कारगवार आणि त्याचा मित्र गजानन मुरस्कर (Roshan Kargwar and Gajanan Murskar) यांनी शेजारी राहणाऱ्या पीडितेला काही घरगुती कामासाठी पैसे देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या घरी नेले. मात्र, नंतर त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. शुभम दामडू (Shubham Damdu) नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. रोशन आणि त्याचा साथीदार बादल यांनी सोन्याच्या अंगठीवरून शुभमची हत्या केल्याचा आरोप होता. त्यांना अकोला रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

रोशन करगावकर (29) आणि त्याचे मित्र/परिचित गजानन मुरस्कर (40), प्रेमदास गाठबांधे (38), राकेश महाकाळकर (24), गोविंदा नाटे (22), सौरभ उर्फ करण रिठे (22) नितेश फुकट (30), प्रद्युम्न करूटकर (22) आणि निखिल उर्फ पिंकू नरुळे (24) अशी आरोपींची नावे आहेत. या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रोशन करगावकर हा अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहतो. रोशन करगावकर हा एका हत्या प्रकराणातील आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने या अत्याचाराची कबुली दिली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश होता याविषय पोलिस अधिक तपास करत आहेत.