Yuvraj Singh च्या घरातून 75 हजार रुपयांचे दागिने गेले चोरीला, आई शबनम यांनी नोकरांवर लगावला चोरीचा आरोप

Yuvraj Singh: माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या पंचकुला येथील एमडीसी सेक्टर 4 येथील घरातून रोख रक्कम आणि दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. युवराज सिंगची आई शबनम सिंग यांनी घरातील दोन कर्मचाऱ्यांवर चोरीचा आरोप करत संशय व्यक्त केला आहे. दोन नोकरांनी मिळून सुमारे 75 हजार रुपयांचे दागिने चोरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

युवराज सिंगची (Yuvraj Singh) आई शबनम सिंग यांनी हाऊसकीपिंग कर्मचारी ललिता देवी आणि स्वयंपाकी सिलदार पाल यांनी चोरी केल्याचा आरोप केला आहे. अहवाल दाखल करताना त्यांनी सांगितले की त्या सप्टेंबर 2023 पासून गुडगावमधील त्यांच्या दुसऱ्या निवासस्थानी राहत होत्या. 5 ऑक्टोबर 2023 रोजी एमडीसीतील घरी परतले तेव्हा कपाटातून सुमारे 75,000 रुपये किमतीचे दागिने आणि इतर वस्तू गायब होत्या.

नोकरांवर चोरीचा आरोप
खोली तपासल्याचे त्यांनी सांगितले. यानंतरही कोणताही सुगावा लागला नाही. यानंतर त्यांच्या लक्षात आले की ललिता देवी आणि सिलदार पाल यांनी अचानक नोकरी सोडली आणि दोघेही दिवाळीच्या दिवशी आपापल्या घरी गेले. शबनमच्या सांगण्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी मनसा देवी पोलिस स्टेशनचे एसएचओ धरमपाल यांनी सांगितले की, ते सध्या या प्रकरणाबद्दल काोणतीही माहिती उघड करू शकत नाहीत.

महत्वाच्या बातम्या

Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा

Manoj Jarange Patil यांची तब्येत महत्वाची, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? – पृथ्वीराज चव्हाण

Devendra Fadnavis | “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी असं वाटतं”, देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?