Sunetra Pawar | पुण्यातील धायरी भागात सुनेत्रा पवार यांचा झंझावाती प्रचार

Sunetra Pawar | बारामती लोकसभा मतदार संघातील शहरी भागावर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघातील धायरी परिसरात सुनेत्रा पवार यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. या प्रचारादरम्यान सुनेत्रा पवार यांनी सामाजिक, उद्योग आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेत महायुतीला निवडून देण्याचे आवाहन केले.

धायरी येथील उद्योजक यशवंत कांबळे आणि हेमंत कांबळे यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली.  तसेच उद्योजक संतोष कदम यांच्या व्यंकटसाई होंडा शोरूमला सदिच्छा भेट दिली. यावेळी कदम व त्यांच्या संपूर्ण स्टाफने सुनेत्रा (Sunetra Pawar) वाहिनींचे  आपुलकीने स्वागत केले. मनसेच्या माजी नगरसेविका युगंधरा चाकणकर यांच्या धायरी येथील संपर्क कार्यालयास पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सनी चाकणकर, सुहास चाकणकर, विक्रम चाकणकर, संतोष कदम यांच्यासह त्यांचे सहकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीच्या घटक पक्षातील एक असणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या स्वागताबद्दल सुनेत्रा पवार यांनी त्यांचे आभार मानले.

धायरी गावचे माजी सरपंच, श्री धायरेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, खजिनदार केशवराव रायकर यांच्या धायरी येथील निवासस्थानी पवार यांनी सदिच्छा भेट दिली. 91 वय वर्ष असूनही केशवराव रायकर यांची उत्तम, ठणठणीत प्रकृती आहे. श्री धायरेश्वराची त्यांच्यावर असणारी ही कृपाच. त्यांनी गावाचा कारभार पाहताना गावाला जसे प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने देवस्थान ट्रस्टचा कारभार करताना अत्यंत काटेकोरपणे शिस्तबद्धपणे केला. त्यांच्या व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या याच प्रयत्नातून आज देवस्थानचा लौकिक सर्वदूर पसरला आहे. स्वतःच्या भल्या मोठ्या एकत्रित कुटुंबालाही त्यांनी एका धाग्यात गुंफले आहे. अशा या वंदनीय व्यक्तिमत्त्वाची झालेली भेट ऊर्जा देणारी ठरली असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.  यावेळी विजयकुमार रायकर, गणेश रायकर, राजेंद्र रायकर व सर्व रायकर कुटुंबीयांनी माझ्यासह महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

यासोबतच प्रसिद्ध गायक जितेंद्र भूरूक यांच्या निवासस्थानी पवार यांनी  सदिच्छा भेट दिली. तसेच  उद्योजक बापू विठ्ठल रायकर, कृष्णात मुरकुटे,  योगीराज आणि औदुंबर सोसायटी व चंद्रनील सोसायटीतील रहिवाशांनी आमच्या सर्वांच्या मनात “घड्याळ” फिक्स असल्याचे सांगत बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित आहे अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांना  दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Mohite Patil | “मोहिते पाटील स्वार्थी, त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली”, अजितदादांच्या नेत्याची जहरी टीका

Sharad Pawar : शरद पवारांची सारवासारव; सुनेत्रा पवारांच्या बाबत केलेल्या वक्तव्याबाबत म्हणाले…

Sunetra Pawar | रखरखत्या उन्हातही सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद, धायरीत जंगी स्वागत