शरद पवारांच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवणार; राणे बंधुच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल

मुंबई – माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधत त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला होता.  शरद पवार यांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडल्या प्रकरणी तसेच हिंदू मुस्लिम तेढ निर्माण केल्याप्रकरणी राणे बंधूंविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस (Mumbai Police) ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

निलेश राणे (nilesh rane) भाजपाचे आमदार नितेश राणे (nitesh rane) या बंधुकडून जाणीपूर्वक समाजामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून दंगली घडतील असे भाष्य केलं जात आहे, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल मुंबई पोलिसांकडे राणे बंधुंच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, नितेश राणे यांनी आझाद मैदानावर बोलताना नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत अशी विचारण शरद पवारांना केली. वास्तविकरित्या राजीनामा घेण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि सरकारचा आहे. पण अनिल देशमुखांचा मराठा म्हणून राजीनामा घेतला पण नवाब मलिक मुस्लिम असल्याकारणाने त्यांचा राजीनामा घेतला नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं. नितेश राणे हे हिंदू-मुस्लिम गटात तेढ, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, अनेक गंभीर आरोप असणाऱ्या नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीनं अटक केल्यानंतरही त्यांचा महाविकास आघाडी सरकारने राजीनामा घेतलेला नाही. त्यावर निलेश राणे यांना एका पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना निलेश राणे म्हणाले, नवाब मलिक हे पवारांचे खास आहेत, असं राणे यांनी म्हटलंय. ‘अनिल देशमुख मराठा होते, त्यांचा घेतला राजीनामा. नवाब मलिकांसाठी वेगळा न्याय का? मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे, असा संशय मला येतो. ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल  देशमुखांचा पटकन राजीनामा घेतलात, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा?’ असा सवाल निलेश राणे यांनी विचारलाय. याच वक्तव्यावर अआक्षेप घेत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.