संजय राऊत यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी – राज ठाकरे

ठाणे – मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आमदार राजू पाटील हस्ते जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन करण्यात आलं. चंद्रांगण रेसिडेन्सी पहिल्या मजला शिळ रोड दिवा पूर्व येथील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांना झापलं आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या पुण्यातील सभेत सेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची नक्कल केली होती, त्यावर संजय राऊत यांनी मिमिक्री करून राजकारण होत नाही असा सल्ला राज ठाकरे यांना दिला होता. यावर राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी, असा टोला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. दरम्यान, या कार्य्कामाच्या स्थळी यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत,अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे उपस्थित होते.