BCCI Central Contracts | ध्रुव जुरेल, सरफराज खानची लागणार लॉटरी? कर्णधार रोहितची कृपा झाल्यास बीसीसीआयच्या वार्षिक करारात मिळणार जागा

BCCI Central Contracts : बीसीसीआय ने खेळाडूंच्या वार्षिक कराराची यादी जाहीर केली आहे. 2023-24 हंगामासाठी जाहीर झालेल्या या यादीत नवखे क्रिकेटपटू ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनाही जागा मिळू शकते. मात्र त्यासाठी त्यांना धरमशाला येथील इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणे आवश्यक आहे.

बीसीसीआयने यावर्षी 30 खेळाडूंना करार दिला आहे. हा करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंतचा आहे. जे खेळाडू या कालावधीत किमान तीन कसोटी किंवा आठ एकदिवसीय सामने किंवा 10 टी-20 खेळण्याच्या निकषांची पूर्तता करतात, त्यांना आपोआप गुणोत्तर आधारावर ग्रेड सीमध्ये समाविष्ट केले जाईल. उदाहरणार्थ- ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनी आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले आहेत, जर त्यांनी इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पाचव्या कसोटीत भाग घेतला, तर त्यांना सी श्रेणीत समाविष्ट केले जाईल. इंग्लंडविरुद्धचा अखेरचा कसोटी सामना 7 मार्च ते 11 मार्चदरम्यान होणार आहे.

ग्रेड सीमध्ये कोणाचा समावेश आहे
रिंकू सिंग, टिळक वर्मा, रुतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार यांचा ग्रेड सीमध्ये समावेश आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

खेळाडूंना किती पैसे मिळतात?
ग्रेड ए प्लसमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वार्षिक7 कोटी रुपये मिळतात. ए ग्रेडला 5 कोटी रुपये आणि बी ग्रेडला 3 कोटी रुपये मिळतात. सर्वात कमी सी श्रेणीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले जातात.

महत्वाच्या बातम्या : 

Loksabha Election: भाजपकडून लोकसभेसाठी २३ निवडणूक निरीक्षकांची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

Rohit Pawar – फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?

Pankaja Munde | पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत? भाजपच्या ‘त्या’ यादीत आलं नाव