कितीही माझ्यावर केसेस घातल्या तरी मी …; निलेश राणेंनी केली आरपारच्या लढाईची तयारी

मुंबई – माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधत त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला होता.  शरद पवार यांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडल्या प्रकरणी राणे बंधूंविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस (Mumbai Police) ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

निलेश राणे (nilesh rane) भाजपाचे आमदार नितेश राणे (nitesh rane) या बंधुकडून जाणीपूर्वक समाजामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून दंगली घडतील असे भाष्य केलं जात आहे, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल मुंबई पोलिसांकडे राणे बंधुंच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यावर आता निलेश राणे यांनी एक लक्ष्यवेधी ट्वीट केले आहे. ते म्हणतात, कितीही माझ्यावर केसेस घातले तरी मी म्हणतच राहणार, मला संशय आहे आणि राहणारच की पवार साहेब दाऊदची व्यक्ती आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी विरुद्ध राणे असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.