भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ‘संविधान सन्मान दौड 2023’ चे आयोजन

Pune: भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ‘संविधान सन्मान दौड 2023’ चे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था ( BARTI), डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, सावित्रीाईं फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी अॅथलेटीक्स असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणेचे अध्यक्ष, ‘संविधान सन्मान दौड’ चे मुख्य आयोजक  परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला दीपक म्हस्के, तानाजी तापकिरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था ( BARTI) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, सावित्रीाईं फुले पुणे विद्यापीठ चे प्रतिनिधी मान्यवर उपस्थित होते.

संविधान सन्मान दौडची माहिती देताना मुख्य आयोजक परशुराम वाडेकर म्हणाले,  या स्पर्धेचे यंदा हे दुसरे वर्षे आहे, मागील वर्षी या स्पर्धेत तब्बल 50 देशांचे 2. हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते, यावर्षी 6 ते 7 हजार स्पर्धक सहभागी होतील असा अंदाज आहे, त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. यंदाची स्पर्धा 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 5. 30 वाजता खाशाबा जाधव क्रीडा संकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून सुरू होणार आहे.  संविधान सन्मान दौड 2023 ही 16 वर्षांखालील, 18 वर्षांखालील आणि खुल्या वयोगटात अशा तीन विभागात घेतली जाणार आहे. ती प्रामुख्याने 3 किलो मीटर, 5 किलो मीटर आणि 10 किलो मीटर अंतराची असणार आहे. याप्रमाणेच  दिव्यांगांसाठीही दिव्यांग व्हीलचेयर रेस (अॅटोमॅटीक) आणि दिव्यांग व्हीलचेयर रेस (मॅन्यूअल) अशा दोन प्रकारात स्पर्धा घेतली जाणार असून ही दौड 2 किलो मीटर अंतराची असणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून नाव नोंदणी  बंधनकारक आहे, 22 नोव्हेंबर ही नाव नोंदणीची शेवटची तारीख आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकास एक टी-शर्ट ,सर्टिफिकेट, मेडल, संविधानाची प्रत, नाष्ट्याचे किट, मेडिकल सुविधा देण्यात येणार आहेत, तसेच सर्व वयोगटातील  पुरुष आणि महिला गटात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृती चिन्ह दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी 9822483714 / 9373887112/ 9850111710 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन परशुराम वाडेकर यांनी यावेळी केले.

संविधान सन्मान दौड चा मार्ग हा  खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथून सुरू होईल आयूका गेट, डॉ. आंबेडकर चौक, औंध रोड बोपोडी, भाऊ पाटील रोड, शाहू चौक येथून यु टर्न पुढे आई आप्पा मंदिर,  विद्यापीठ मेन गेट, विद्यापीठ मेन बिल्डिंग आणि समारोप खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे होणार असल्याचेही वाडेकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

प्रदूषणात घराबाहेर पडत असाल तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; दुष्परिणामांपासून करा स्वत:चा बचाव

पूर्ण कुटुंबासह परिणीती चोप्रा पोहोचली हनीमूनला, मालदीवमध्ये सासूसोबत पोज देताना दिसली

नास्तिक असलो तरीही रामसीतेच्या देशात जन्मल्याचा मला अभिमान आहे- जावेद अख्तर