नास्तिक असलो तरीही रामसीतेच्या देशात जन्मल्याचा मला अभिमान आहे- जावेद अख्तर

Javed Akhtar: मी नास्तिक आहे. पण, रामसीतेच्या देशात जन्मल्याचा मला अभिमान आहे, असे वक्तव्य लेखक जावेद अख्तर यांनी मनसेच्या दिपोत्सवात केलं. मनसेच्या दीपोत्सवाचं यंदा ११ वं वर्ष साजरं होत आहे. यावेळी लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि सलीम खान (Saleem Khan) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी रितेश देशमुखसह अनेक कलाकार उपस्थित होते.

यावेळी बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, मला येथे काही गोष्टी स्पष्टपणे बोलाव्या लागतील. तेव्हाच त्याची मजा येते. अनेक लोक हैराण झाले असतील. ते म्हणत असतील की राज ठाकरेंना फक्त जावेद अख्तर आणि सलीम खान हे दोघेच मिळाले का? अनेकांना वाटत असेल की माझ्यासारख्या नास्तिकाला या कार्यक्रमात का बोलावलं. यांना धार्मिक कार्यक्रमात का बोलावलं?, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

ज्यांना महाभारत आणि रामायण माहीत नसेल तो काय हिंदूस्तानी असेल? ही आपली संस्कृती आहे, आपली ओळख आहे. या गोष्टीवर आपण जितका गर्व करु तेवढं कमी आहे. पण, माझ्यासारख्या नास्तिकासाठी देखील हा गर्वाचा वारसा आहे. मी अशा देशात जन्मलोय जो श्रीरामचंद्र आणि सीता यांचा देश आहे. याचे दोन कारणं आहेत. एकतर राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत. पण, राज ठाकरेंनी त्याच्या शत्रुला देखील बोलावलं तरी कोणी त्यांचं निमंत्रण नाकारु शकत नाही. पण, मी तर मित्र आहे. मी श्रीराम आणि सीता यांना फक्त हिंदूंचा वारसा मानत नाही. या देशातील प्रत्येक व्यक्तीचा, या भूमिवर जन्म घेतलेल्या, जो स्वत:ला हिंदूस्थानी म्हणवतो त्याच्यासाठी रामायण हा सांस्कृतिक वारसा आहे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत; विद्याताई चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला..

‘सरकारने मराठा आरक्षणावर एकमत केलं पाहिजे; मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरं बोलतात’