संजय राऊतांपासून एका महिलेला मूल झालेले आहे; शिरसाटांचा गौप्यस्फोट 

छत्रपती संभाजीनगर – शिवसेनेचे नेते आ. संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊतांपासून (Sanjay Raut) एका महिलेला मूल झालेले आहे असा गंभीर आरोप केला आहे. याबाबत आपल्याकडे व्हिडिओदेखील असल्याचा दावा शिरसाटांनी केला आहे. त्या महिलेला संजय राऊतांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती असेही शिरसाट म्हणाले.

नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय शिरसाट व खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे नाव घेत संजय राऊत थुंकले होते. त्यामुळे शिंदे गट आक्रमक झाला असून संजय राऊतांना घेरण्याची रणनिती शिंदे गट आखत असल्याचे दिसत आहे. यातच आता शिरसाट यांनी हा गौप्यस्फोट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राऊतांना आता फक्त बोलून चालणार नाही. करून दाखवावे लागणार आहे. असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे.

ज्या महिलेला संजय राऊतांपासून मूल झाले आहे, त्या माऊलीचे नाव मी घेऊ इच्छित नाही. मात्र, हे प्रकरण जगजाहीर आहे. शिरसाटांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसात हे प्रकरण समोर येईल असा इशारा दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शिरसाटांच्या या दाव्यावर आता राऊत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.