‘50 टक्के क्षमतेने नाट्यगृह उघडणार असतील तर सर्व निर्मात्यांना पण अर्धे भाडे माफ करावे’

‘50 टक्के क्षमतेने नाट्यगृह उघडणार असतील तर सर्व निर्मात्यांना पण अर्धे भाडे माफ करावे’

पुणे : महाराष्ट्र सरकारने दि.22 ऑक्टोबर पासून सर्व नाट्यगृह व चित्रपट गृह 50 टक्के आसन क्षमतेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचे स्वागत करत आज लोक जनशक्ती पार्टी व विकल्प गृप च्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येरवडा, पुणे या ठिकाणी रंगमंचाचे पूजन करण्यात आले

लोक जनशक्ती पार्टी चे पुणे शहर व जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट व गायीका व महीला आघाडी च्या सरचिटणीस कल्पना जगताप यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच नटराजाचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरूवात नांदी व गण गाऊन करण्यात आली त्यानंतर नाट्यगृहातील सर्व कर्मचारी बांधवाना सन्मानितकरण्यात आले

सदर प्रसंगी बोलताना संजय आल्हाट म्हणाले की लोक जनशक्ती पार्टी ही नेहमीच कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, दोन वर्षांत कलाकारांची अवस्था खूप बिकट झाली आहे. सरकारनं जी मदतीची घोषणा केली आहे त्याची लवकर पुर्तता करावी तसेच 50 टक्के आसनक्षमतेत नाट्यगृह सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निर्मात्यांना न परवडणारा आहे म्हणून सर्व निर्मात्यांना नाट्यगृहाच्या भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात यावी, सर्व लोककलांचे जतन व संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेऊन लवकरच लोककला प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असून राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चिराग पासवान यांची भेट घेऊन लोककलावंतासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले व सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या.

सदर प्रसंगी सिने अभिनेते प्रशांत बोगम, चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर, शिवा बागुल, अभिनेते श्रीकृष्ण भिंगारे, पुणे शहर सरचिटणीस के सी पवार, दादा चव्हाण, वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संतोष पिल्ले, अप्पा नाकाडे,सतीश धेंडे, आनंद जेधे,जीवन शिंदे इत्यादी कलावंत उपस्थित होते.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=Egi–9bLtao

Previous Post
१७ डिसेंबरला बसणार जब्याचा 'फ्री हिट दणका'

१७ डिसेंबरला बसणार जब्याचा ‘फ्री हिट दणका’

Next Post
'राज्य सरकारच्या एका मंत्र्याला राजस्थानातून धमकीचा फोन यावा हे आश्चर्यच आहे'

‘राज्य सरकारच्या एका मंत्र्याला राजस्थानातून धमकीचा फोन यावा हे आश्चर्यच आहे’

Related Posts
shikant deshmukh

महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच देशमुखांचा भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

सोलापूर : हनीट्रॅपमध्ये अडकलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) सोलापूर (Solapur) (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांनी आपल्या…
Read More
शेअर बाजाराच्या खेळपट्टीवरही सचिनची शानदार फलंदाजी! नऊ महिन्यांत 5 कोटींचे बनवले 31.55 कोटी

शेअर बाजाराच्या खेळपट्टीवरही सचिनची शानदार फलंदाजी! नऊ महिन्यांत 5 कोटींचे बनवले 31.55 कोटी

Sachin Tendulkar Share Market :- क्रिकेटच्या मैदानावर आपल्या शानदार फलंदाजीने धावा करणारा सचिन तेंडुलकर आता शेअर बाजाराच्या खेळपट्टीवरही…
Read More
देशात HMPV विषाणूचे चार रुग्ण आढळले | HMPV Virus

देशात HMPV विषाणूचे चार रुग्ण आढळले | HMPV Virus

HMPV Virus : तमिळनाडू आणि कर्नाटकात प्रत्येकी दोन HMPV (ह्युमन मेटा-प्न्यूमोव्हायरस) विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकातील तीन आणि…
Read More