सार्‍या जगाचा राम लल्ला, भाजप हरला तर दर्शन घेऊ देणार नाही का?

Amit Shah : अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामात काँग्रेसने अडथळे आणल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी केला आणि मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल, असे आश्वासन मतदारांना दिले. मध्य प्रदेशच्या गुणा जिल्ह्यातील राघोगढ येथील जाहीर प्रचारसभेत गृहमंत्री शाह बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही ३ डिसेंबरला भाजपाचे सरकार आणा, तुम्हाला रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजपा सरकार करेल अशी घोषणा अमित शाह यांनी केली आहे.

दरम्यान, या घोषणेनंतर ठाकरे गटाला मिरच्या झोंबल्या आहेत. शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत MP sanjay raut ) यांनी मंगळवारी (१४ नोव्हेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप नेत्यांवर कारवाई करण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली. याचे कारण भाजप नेते राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावनांचा वापर करत असल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे.

गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले की, भगवान राम हे कोणत्याही एका प्रदेशापुरते मर्यादित नसून त्यांचे अनुयायी संपूर्ण देशात आणि जगात आहेत. मध्य प्रदेशात भाजपचा पराभव झाला तर पक्ष राज्यातील जनतेला दर्शन घेण्यापासून रोखेल किंवा भाजपला मतदान केले नाही म्हणून त्यांच्यावर आरोप करतील, असा त्याचा अर्थ काढायचा का, असा सवाल त्यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते म्हणाले, ‘राम लल्ला संपूर्ण देशाचा आणि जगाचा आहे. याचा अर्थ तुम्ही मध्यप्रदेशात हरलात तर मध्य प्रदेशातील लोकांनी तुम्हाला मत दिले नाही म्हणून तुम्ही त्यांना दर्शन घेण्यापासून थांबवाल किंवा तुम्ही त्यांच्यावर शुल्क आकाराल?’ ते म्हणाले, ‘आपल्या देशात कसले राजकारण सुरू आहे? यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

IND Vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत