IND vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

Virat Kohli IND vs NED: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohali) जलवा विश्वचषकात आज पुन्हा पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेत त्याने अनेक मॅचविनिंग इनिंग खेळल्या आहेत. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यातही विराट कोहलीच्या बॅटची ऐतिहासिक खेळी पाहायला मिळाली. त्याने एकदिवसीय विश्वचषकात सचिन तेंडुलकरच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

विराट कोहलीने नेदरलँड्सविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात ५६ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. यादरम्यान विराटने 5 चौकार आणि एक षटकार लगावला. २०२३ च्या विश्वचषकात विराट कोहलीने ५० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी खेळण्याची ही ७वी वेळ होती. यासह, तो विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. याआधी या विश्वचषकात फक्त सचिन तेंडुलकर आणि शकीब अल हसन 7 वेळा 50+ धावांची इनिंग खेळू शकले. तर रोहित आणि वार्नर यांच्या नावावर ६ वेळा अशी कामगिरी करण्याचा विक्रम नावावर आहे.

विश्वचषक २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली पुढे गेला आहे. त्याने 9 सामन्यात 99.00 च्या सरासरीने 594 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 5 अर्धशतके आणि 2 शतके झळकावली आहेत. त्याचवेळी रोहित शर्मा 503 धावा करत या यादीत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, क्विंटन डी कॉक ५९१ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्वाच्या बातम्या – 

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत

डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी या योगासनांचा सराव करा, आयुष्यभर लागणार नाही चष्मा!

Beetroot Carrot Juice: गाजर आणि बीटरूटचा रस हिवाळ्यात आहे खूप फायदेशीर, जाणून घ्या त्याचे काही आश्चर्यकारक फायदे